कुंडल

कुंडल हे गांव 1942 च्या क्रांतीमध्ये अग्रेसर होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृतवाखाली प्रती सरकारची स्थापना करण्यात आली. या गावाचे नेतृत्व क्रांती अग्रणी जी. डी.(बापूसाहेब)लाड यांनी केले. या प्रती सरकारच्या तुफानी सेनाचा 600 खेडयामध्ये कारभार चालत असे व त्या तुफान सेनेला प्रशिक्षण कुंडल मधील क्रांतीनगर येथील कुंभेश्वर व्यायाम शाळेत दिले जात असे. या गावात पुर्ण जिल्हातील व जिल्हयाबाहेरील मुलांचेसाठी क्रांतीसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतीगृह सन 1947 पासून सुरु आहे. सध्या वेगवेगळया भागातील 138 विद्यार्थी आहेत. पैकी मागासवर्गीय 80 विद्यार्थी आहे. गावची सध्याची लोकसंख्या 17 हजार असून सर्व धर्मिय समाजासाठी एकच दफन स्मशान भूमी असून त्यामध्ये शवदाहिण्या आहेत. या गावामध्ये दरवर्षी अनंतचतुर्थीनंतर येणाया पहिल्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिध्द मोठे कुस्ती मैदान भरविले जाते. प्रथम क्रमांच्या कुस्तीस 2 लाखाचे बक्षीस दिले जाते. दर 12 वर्षातून 3 महादेवाच्या देवळात भागीर्थी वेदांचे पाणी येथे मोठा साहेळा भरला जातो.