या गावाचे सन 2003–2004 मध्ये यशवंत ग्रामसमृध्दी योजनेमधून 6 सार्वजनिक शौचालयाची युनिटे स्त्रिया व पुरुषांसाठी पूर्णावस्थेत असून एकूण खर्च 20 लाख आहे. तसेच या पूर्वी 12 युनिटमधील 72 शौचालये वापरात आहेत. गाव निर्मलग्राम होणेसाठी 600 शोचालये. मानवी विष्टेवरील बायोगॅस, सयंत्र कार्यान्वयीत आहेत. लोक वर्गीणीतून कुंडल फाटा येथे 3.50 लाखाच्या स्वागत कमालिचे काम झाले आहे. या गावात दोन देशी दारु दुकाने 6 वर्षापुर्वी लोक अंदोलनाने बंद केलेले आहेत. या गावाभोवती 4000 मीटर लांग 15 फुट रुंद असा रिंगरोड लोक वर्गणी, श्रमदान व घनकचयाचा वापर करुन बनविण्यात आलेला आहे. त्यावरती आमदार व खासदार फंडातून खडीकरण व डांबरीकरणे केलेले आहे. या गवामध्ये सुकदेव कनुन्जे यांनी कनुन्जे नर्सरी फर्म अद्यावत प्रकारे उभा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या नर्सरीची मोठया प्रामणात मागणी होत आहे. या गावामध्ये एक गाव एक गणपती असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या गावामध्ये कुंडल पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये मागील तीन वर्षात कुंडलमध्ये फक्त 48 गुन्हे नोंद आहेत. गावामध्ये तंटयाची सोडवणूक स्थानिक पातळीवर केली जाते. निर्मलग्राम राज्यस्तरीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होऊन केंद्रीय तपासणी केलेली असून दि. 31 मार्च 2006 ला गाव हांगणदारी मुक्त झाले. पुरग्रस्तांना मदत म्हणून 1000 किट्सचे वाटप.